गेट वे ऑफ इंडिया परिसरात शुकशुकाट - मुंबईत विकेंड लॉकडाऊन
मुंबई - शहर परिसरात 'विकेंड लॉकडाऊन' सुरू आहे. अनेक पर्यटन स्थळांवर शुकशुकाट आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे देश-विदेशातून अनेक पर्यटक येतात तसेच मुंबईहून देखील मुंबईकर सुट्टीच्या दिवशी गेटवे ऑफ इंडिया येथे गर्दी करतात. मात्र, लॉकडाऊन असल्याकारणाने या परिसरात शुकशुकाट दिसून आला. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा केव्हज आणि अलिबागला पर्यटक जात असतात. मात्र, सध्या बोटीदेखील किनाऱ्यावर लागल्या आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी..