मंत्री जयंत पाटलांच्या घरीही बाप्पाचे आगमन; जनतेवरील संकटं दूर व्हावीत..बाप्पाला घातलं साकडं - ganeshotsav at minister jayant patil sevasadan home
मुंबई - राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सेवासदन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. यावेळी त्यांनी सहकुटुंब बाप्पाची स्थापन करून पूजाअर्चा केली. मागचा कालखंड आपल्या सर्वांसाठीच मोठा अडचणीचा होता. जगभरात कोरोनाचे थैमान घातले होते तर महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे पूराचा संकटाचा सामना करावा लागला. गणराया हा सर्व दुःखांचा हर्ता आहे. कोरोनामुळे, महापुरामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आता बाप्पाचे आगमन झाले आहे. ही सर्व संकटे दूर होवोत, असे साकडे गणपती बाप्पाला घातले.