गणेशोत्सव 2021: कोल्हापुरात सौरभ पाटलांकडून देखाव्यातून पालिका अग्निशमन दलाच्या कार्याचा गौरव - गणेशोत्सव 2021
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवात दरवर्षी अनेकजण विविध देखावे सादर करत असतात. यावर्षी सुद्धा अनेकांनी विविध प्रकारचे देखावे सादर केले आहेत. येथील सौरभ नामदेव पाटील यांनीही कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या कार्यावर प्रकाश टाकणारा देखावा बनवला आहे. अग्निशमन दल कोल्हापूरच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असते. अग्निशमन दलाची तत्परता आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा पाटील कुटुंबाने एक छोटासा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा देखावा पाहण्यासाठी अनेकजण भेट देत आहेत.