गणेशोत्सव 2021 : विजय वडेट्टीवारांच्या घरी गणरायाचे आगमन, टीका करणं टाळलं - विजय वडेट्टीवारांच्या घरी गणरायाचे आगमन
नागपूर : महाराष्ट्राचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नागपूर येथील रामदास पेठेतील निवस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सपत्नीक गणरायाचे पूजन केले. 'गेल्या दोन वर्षात वादळं, कोरोनाची लाट आहे. जरी लाट उंबरठ्यावर असली तरी ही लाट येऊ नये, सर्वांना सुखी ठेव, कोरोनाच्या रुपात आलेले हे सर्वांचे दुःख दूर कर आणि महाराष्ट्राला पुन्हा उभारी येण्याचे बळ दे' अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली. दरम्यान, यावेळी शुभ दिवस असल्याने त्यांनी इतर विषय; खासकरून कोणत्याही पक्षावर टीका करणं टाळलं.