Video : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गणेश जन्म सोहळा संपन्न - गणेश जन्म सोहळा संपन्न
पुणे - आज पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गणेश जन्म सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिलावर्ग उत्साही दिसत होत्या. एकमेकींना सुंठवडा वाटणे हळदी कुंकू लावणे आदी कार्यक्रम यावेळी महिलांनी केले. गणेश मंदिरामध्ये सुरेख अशी आरास केली होती. तसेच फुलांच्या सजावटीने गणेशाचा पाळणा सजवला गेला होता. यावेळी महिलावर्ग प्रचंड उत्साहात दिसून आल्या. मंदिर समिती तर्फे भाविकांची चोख व्यवस्था केली गेली होती. यावेळी वाहनांचे व्यवस्थित नियोजन आणि सोबतच दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज अशा रांगा नियोजित होत्या. मात्र तरी देखील लोकांकडून आज गणेश यामुळे प्रचंड गर्दी जमली होती.