विद्यार्थ्यांनी साकारले बांबूपासून 'बाप्पा', बांबू संशोधन केंद्राचा अभिनव उपक्रम - ganpati in chandrapur
चंद्रपुरात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने बांबू पासून गणपती बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना बांबूचे तुकडे देण्यात येऊन या मुलांनी बांबूपासून आपल्या मनातील 'बाप्पा' साकारले. पंधरा शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून यात सर्वोत्कृष्ट मूर्ती साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे.