'ईडा-पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे', मंत्री केदार यांचं गणरायाला साकडं - केदार यांचं गणपतीला साकडं
नागपूर : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यानी त्यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना केली. सपत्नीक पूजाही केली. यावेळी त्यांनी 'कोरोनाचे संकट सरुन जाऊ दे. गोर-गरींबाचे सुखाचे क्षण येऊ दे. शेतकरी राजाला भरपूर पिकू दे. प्रत्येक माणसाच्या मनात जीवन जगण्याचा उत्साह निर्माण होऊ दे' असं गणरायाला साकडं घातलं. तसेच, सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्यात. दरम्यान, कालपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. सर्वत्र आनंदी, उत्साही आणि भक्तीमय वातावरण आहे.