शासकीय इतमामात होणार डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्यावर अंत्यसंस्कार; पार्थिव भक्तीस्थळावर - लातूर ताज्या बातम्या
लातूर - डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे पार्थिव अहमदपूर येथील भक्तीस्थळावर दाखल झाले आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नांदेड येथून पार्थिव थेट भक्तस्थळवर आणण्यात आले असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे योग्य ती काळजी घेतली जात आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत तसेच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भक्तीस्थळावर गर्दी होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जात आहे. रविवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी महाराज यांची रुग्णालयात भेट घेतली होती. त्यावेळी भक्ती स्थळावर अंत्यसंस्कार करण्याची ईच्छा महाराज यांनी व्यक्त केली होती. शिवाय महाराजांना कोरोना असल्याचेही निष्पन्न झाले असल्याने गर्दी टाळली जात आहे.