पुण्याच्या जुन्नरची अवघ्या चार वर्षांची 'हिरकणी' - four year hirkani pune
पुणे - अवघ्या चार वर्षाच्या रुद्राणीने सर्वांना चकीत करणारी कामगिरी केली आहे. ती जुन्नर तालुक्यातील धोलवड गावाची आहे. चार वर्षाच्या रुद्राणीनं ठाणे जिल्ह्यातील अवघड असा भैरवगड सर केला आहे. त्यामुळे रूद्राणीला गड किल्ले "लहान वयात सर करणारी "हिरकणी "म्हणून नवी ओळख मिळाली आहे.