वड्डेट्टीवार आणि भुजबळ हे ओबीसी समाजाची दिशाभूल करताहेत - हरिभाऊ राठोड - विजय वडेट्टीवार
यवतमाळ - राज्य सरकारमधील दोन मंत्री विजय वड्डेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ हे विरोधकांची भाषा बोलत आहे. हे दोन मंत्री तिढा निर्माण करीत आहेत. या दोन्हीही मंत्र्यांवर हरीभाऊ राठोड यांनी सडकून टीका केली आहे. माननीय सर्वोच्य न्यायालयाने जो ओबीसी समाजाच्या बाबतीत निर्णय दिला आहे. तो अतिशय चांगला आहे. त्याचे स्वागत करतो असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, सरकार तर तुमचेच आहे. तर तुम्ही सर्वप्रथम ओबीसी समाजासाठी सर्वप्रथम आयोग नेमा आणि डाटा तयार करा. अन्यथा राजीनामा द्या आणि मोकळे व्हा, समाजाची दिशाभूल करू नका अशा शब्दात हरिभाऊ राठोड यांनी या दोन मंत्र्याना सुनावले आहे.