अनिल देशमुखांकडून जीवाला धोका - तक्रारदार अॅड. डॉ. जयश्री पाटील - anil deshmukh threaten me advocate jaishri patil
मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील तक्रारदार अॅड. डॉ. जयश्री पाटील ज्यांचे स्टेटमेंट प्रथम ईडीने नोंदवलं. त्यानंतर सीबीआयसह केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी चालू केली आणि अखेर जयश्री पाटील यांच्या मोठ्या लढ्यानंतर, देशमुख यांना अटक झाली. अटकेनंतर जयश्री पाटील यांच्या जीवितास आणि त्याच्या कुटुंबीयांना अनिल देशमुख आणि इतरांकडून धोका असल्याचे त्यांनी सांगितले. जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचादेखील रोल तपासण्यात यावा, अशी विनंती केली.