महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी मोर्शी तहसीलदाराच्या कार्यालयाला ठोकले कुलूप - Tehsil Office lock Anil Bonde

By

Published : Jul 28, 2021, 9:39 PM IST

अमरावती - मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसानीचे पैसे तहसीलदारांनी शेतकऱ्यांना दिले नसल्याचा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र, एसडीओ व तहसीलदार उपस्थित नसल्याने अनिल बोंडे यांनी मोर्शी तहसीलदाराच्या कार्यालयाला कुलूप ठोकत आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे लाटणाऱ्या मोर्शी येथील तहसीलदाराचे निलंबन करा, अशी मागणी बोंडे यांनी केली. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार निवेदन घेण्यासाठी हजर नसल्याने त्यांच्या कार्यालयाच्या दरवाज्यावरच निवेदन लावण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details