ईटीव्ही भारत विशेष : मिठाई खातायं? मग हा व्हिडिओ नक्की पाहा...
काहीच दिवसांवर दिवाळी सण आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत नसले तरीही मिठाईची मागणी बाजारात कायम आहे. सणासुदीला गोड पदार्थांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र अशा वेळी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. खाण्याचे रंग, खवा, पिठीसाखर, व्हिनेगर,तूप, आदी पदार्थांमध्ये ही भेसळ होते. यापासून वाचण्यासाठी आणि हानिकारक पदार्थांचे सेवन करण्यापासून सावध राहण्यासाठी 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...