VIDEO : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धुक्याची चादर; शेतकरी मात्र चिंतेत - अमरावतीत धुक्यामुळे शेतकरी चिंतेत
अमरावती - मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे आज पहाटे जिल्ह्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरलेली बघायली मिळाली. या धुक्याच्या चादरीमुळे आज पहाटे पासूनच नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 देखील या धुक्यात अक्षरशः हरवून गेला होता. त्यामुळे वाहन चालकांवर हेडलाईट लाऊनच वाहन चालवण्याची वेळ आली होती. मात्र, एककिडे या धुक्याने गारवा निर्माण झाला असला तरी हे धुकं शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरण्याची शक्यता आहे.