Exclusive : महापुराचा रेशन धान्य दुकानांना फटका; धान्य पाण्यात बुडाल्याने शेवटी खड्डा काढुन पुरण्याची वेळ - kolhapur flood effect on ration shops
कोल्हापूर - जिल्ह्यात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे बुडाली तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. महापुराचा अनेक गावातील रेशन धान्य दुकानांनाही मोठा फटका बसला आहे. महापुरामुळे दुकानांमध्ये असलेले धान्य सुरक्षित स्थळी हलवू शकले नसल्याने अनेक दुकानांमधील धान्य भिजून कुजले आहे. परिसरातील दुर्गंधी पसरू लागल्याने नाईलाजाने शेवटी धान्याची पोतीच्या पोती पुरावी लागली आहेत. जिल्ह्यातील बाजार भोगाव गावातील रेशन धान्य दुकानातसुद्धा पाणी शिरल्याने शेवटी धान्य जमिनीमध्ये जेसीबीच्या साहाय्याने खड्डा काढून पुरावे लागले आहे. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.