कोल्हापुरात महापुराने संसार केले उद्धवस्त; बघा ईटीव्ही भारतचा रिपोर्ट... - कोल्हापूरमध्ये महापूराचा हाहाकार
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये महापुराचा हाहाकार माजला होता. त्यामुळे अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र, आता पूर ओसरल्यानंतर नागरिक आपल्या घरी परतत आहेत. मात्र, घर होत्याचे नव्हते झाले आहे. आता ते कसे सावरावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी घेतलेला हा आढावा....