'त्या' पाचजणी पॉकेटमनी मधील पैशातून रुग्णांच्या नातेवाईकांना देताहेत मोफत नाश्ता - kolhapur breaking news
कोल्हापूर - जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी खास पाहायला मिळत आणि याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून काही मुली पॉकेटमनीतील पैशातून सीपीआर रुग्णालयातील रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना रोज सकाळी घरी बनवलेला सकस नाश्ता देण्याचे काम करत आहेत. मिळालेल्या पॉकेटमनीमधून पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम खाण्याची त्यांची सवय होती. पण, एक दिवस कोविड लसीकरणाच्या चौकशीसाठी त्या सीपीआर रुग्णालयात आल्या व आणि त्यांची वैचारिक दिशाच बदलून गेली आहे.