महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : पंचगंगा नदीत माशांची परेड! पाहा व्हिडिओ - पंचगंगा नदीत माशांची परेड

By

Published : Jan 20, 2022, 10:32 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी नेहमीच प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेचा विषय असते. यापूर्वी कधी फेसळालेले पाणी तर कधी मृत माशांचा खच लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आज पंचगंगा नदीत इथल्या नागरिकांना वेगळंच चित्र पाहायला मिळाले. हजारो मासे जणू परेड प्रमाणेच नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर दिसून आले. कधी तासंतास पाण्यात गळ टाकूनही मासे मिळत नाहीत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीत मासे पाहून अनेकजण चक्रावले. माशांचा हा अफलातून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामागे नेमकं कारण स्पष्ट झाले नसले तरी हा प्रदूषणाचा परिणाम आहे का अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details