सीरमच्या 'कोविशिल्ड' लसीचे देशभरात वितरण सुरू, विमातळावरून 'ईटीव्ही भारत'चा आढावा - कोरोना लस न्यूज
पुणे - कोरोनाच्या प्रतिकारासाठी सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेल्या 'कोविशिल्ड' लसीने भरलेले तीन कंटेनर आज कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले. ही लस १६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणाऱ्या देशांतर्गत लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी कंपनीचे मांजरी कार्यालय ते लोहगाव रस्त्यावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विमानतळावरून आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी सज्जाद यांनी...