भिवंडीत कापडाच्या गोदामाला आग, लाखोंचे झाले नुकसान - भिवंडीत कापडाच्या गोदामाला आग
ठाणे - भिवंडी शहरातील शांतीनगर येथील जब्बार कंपाउंड भागातील कापडाच्या चिंध्या साठवलेल्या भंगार गोदामाला आज मंगळवाच(दि. 14 डिसेंबर)रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये लोचन, पुठ्ठा, धागे असा लाखोंचा माल जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या चार बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल तीन तासाने ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. दरम्यान, सध्या याठिकाणी कुलिंगचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.