तळोजा एमआयडीसीमधील मोकळ्या गोडाऊनला भीषण आग - मोकळ्या गोडाऊनला भीषण आग
नवी मुंबई - तळोजा एमआयडीसी येथील वावंजे गावामध्ये केमिकल पावडर साठा असलेल्या मोकळ्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आज(25 ऑक्टोबर) दुपारी ही आग लागली. यामुळे परिसरातील लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून, ही आग नियंत्रणात आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी तळोजा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक भरत पाटील, पोलीस नाईक संदीप कर्डिले दाखल झाले.