VIDEO : आगीतील जखमींवर भाटिया आणि नायर रूग्णालयात उपचार सुरू - fire at Mumbai
मुंबई - कमला इमारतीला लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत सात जण दगावल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पहाटे लागलेल्या आगीत वीस जण जखमी झाली होती. या जखमी रुग्णांना भाटिया आणि नायर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यापैकी सात जण गंभीर जखमी असल्याने पाच जणांना नायर रुग्णालय एक जण भाटिया तर एक जण कस्तुरबा रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. मात्र गंभीर जखमी असलेल्या या सातही जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचा नायर रुग्णालयाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी घेतलेला हा आढावा...