VIDEO : इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानाला आग; संपूर्ण दुकान जळून खाक - fire at electric shop
मुंबई - विक्रोळी पार्कसाईट येथील आनंद गडजवळ एक इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानाला काही वेळापूर्वी भीषण आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत हे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. आग नेमकी कशामुळे लागली? याचा शोध विक्रोळी पार्कसाईट पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहेत. सुदैवाने आग वेळेत विझल्याने आजूबाजूची दुकाने वाचली.