कोल्हापूर : सात दिवसात एफआयआर दाखल करा; अन्यथा न्यायालयात, किरीट सोमैयांचा इशारा - hasan mushrif FIR
कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमैयांनी मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यासंवादात ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंग जंग पछाडले तरी मी पोलीस ठाण्यात पोहोचलो. महाविकास आघाडीमधील नेत्यांनी माफियागिरीसारखा पोलिसांचा वापर केला. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आदेशानुसार मला कोंडून ठेवण्यात आले. हे त्यांना कोणत्या अधिकाराने केले, यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले. मला खात्री आहे ठाकरे सरकार या पोलीस ठाण्याकडून तक्रार दाखल करून घेणार नाही. सात दिवसात एफआयआर दाखल नाही केले तर न्यायालयात जाणार असा, इशाराही त्यांनी यावेळी दिला.