Video : नारायण राणेंच्या बेताल वक्तव्यावरून राडा, शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
मुंबई : भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलताना बेताल वक्तव्य केले. यामुळे राज्याभरात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. मुंबईतील जुहू येथे राणेंच्या घराबाहेर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आपापासात भिडल्याचे समोर आले आहे. मुंबईत युवासेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. दरम्यान, राणेंवर पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या अटकेची शक्यता आहे.
Last Updated : Aug 24, 2021, 1:11 PM IST