महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : पुरुष कर्मचाऱ्याकडून महिलेला केस धरून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण, वाडामधील एका कंपनीतील प्रकार - पुरुष कर्मचाऱ्याची महिलेला मारहाण

By

Published : Oct 13, 2021, 7:17 PM IST

पालघर जिल्ह्यातील वाडा येथील एका कंपनीत महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला केलेल्या मारहाणीची संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. वाडा तालुक्यातील कोणसई येथे एका कंपनीत एका पुरुष कर्मचाऱ्याने कंपनीतीलच एका महिलेला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी महिलेची सुटका करण्यास गेलेल्या व्यक्तीला देखील आरोपीकडून मारहाण करण्यात आली. वाडा पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना असून मारहाणीचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात वाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपी विरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details