ईटीव्ही भारत विशेष : मुंबईचे प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट सुरू होणार - फॅशन स्ट्रीट सुरू होणार
मुंबई - चर्चगेट व सीएसटी स्थानकानजीकचा ‘फॅशन स्ट्रीट’ म्हणजे कपडे, नवनवीन उत्पादनांची सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात विक्री करणारी बाजारपेठ. हे मार्केट जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी लाखो लोक खरेदीसाठी येतात. पण, लॉकडाऊन काळात गेले सहा महिने हे मार्केट बंद आहे. संपूर्ण शुकशुकाट या ठिकाणी होता. त्यामुळे या बाजारपेठेतील साडेचारशे दुकानदार व हजारो लोकांवर आर्थिक संकट कोसळले. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर या सोमवारपासून मार्केट सुरू होत आहे. तसेच सहा महिने दुकानदारांनी काय केले? याविषयी दुकानदारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश कारकरे यांनी -