पंचनामे खूप झाले आता थेट नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी - अमरावती जिल्हा बातमी
अमरावती - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवस वादळी वाऱ्यासह गारपीठ व पाऊस झाला. यात रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारने पंचनामे न करता तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.