VIDEO : पोळ्याच्या पूर्वसंध्येला सर्जाराजाची खांदे मळणी! - 'पोळा साधेपणाने साजरा करावा'
वाशिम - शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा हा अवघ्या एका दिवसावर आला आहे. ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला खूप महत्त्व आहे. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. त्यानिमित्ताने आज (रविवारी) शेतकऱ्यांनी गावा जवळच्या नदी, नाले व पाझर तलावासह धरणावर बैलांना स्वच्छ पाण्यात पोहाळणी दिली जाते. बैलांची खांदे मळणी करून आज आवतन घ्या, उद्या जेवायला या अशी साद शेतकरी बैलांना घालून आमंत्रण देतात. परंतु कोरोनामुळे साजरा होणारा बैलपोळा सण घरीच साजरा करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदातचा काहीसा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले.