Vel Amavasya 2022 : उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली 'वेळ अमावस्या' - महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी साजरी केली येळवस
उस्मानाबाद - जिल्ह्यासह सीमावर्ती भागात रविवारी (दि. 2 जानेवारी) बळीराजाचा ( Farmers Celebrated Vel Amavasya ) महत्वाचा सण साजरा करण्यात आला. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला बळीराजाचा सण म्हणजे 'येळवस' अर्थात वेळ आमावस्या ( Vel Amavasya ). यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. भारतीय व्दिपकल्पात सिंधू संस्कृतीपासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधू ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंधू मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यामधील जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजले जावू लागले. विहिरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे.