कर्जमाफीनंतरही शेतकऱ्याची आत्महत्या; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची मन हेलावून टाकणारी कहाणी - आत्महत्याग्रस्थ शेतकरी कुटुंब
लातूर - महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, शेतकरी आत्महत्येचे सत्र काही थांबेना. फडणवीस सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या योजनेत नाव न आल्याने आणि ठाकरे सरकारच्या कर्जमुक्तीच्या घोषणेतूनही कर्जाच्या बोज्यातून सुटका होणार नाही. या विंवचनेतून कर्जबाजारी झालेले गाधवड येथील तरुण शेतकरी वैजिनाथ रामलिंग बुजभळ यांनी वाढत्या कर्जाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केली होती. मांजरा पट्टा आणि शेतीसाठी सुपीक जमीन ही लातूरची भौगोलिक स्थिती असतानाही गेल्या ३ वर्षांपासून या जिल्ह्यालाही शेतकरी आत्महत्येने ग्रासलेले आहे. वर्षभरात ९९ शेतकऱ्यांनी कर्जाचा वाढता डोंगर, नापिकी अशा शेतीसंबंधीच्या प्रश्नावरून जीवन संपिवले आहे. कर्जमाफीचा तिढा कायम असतानाच २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे.