Fake Currancy Seized : अकोल्यात 23 लाख 96 हजाराच्या बनावट नोटा जप्त; तिघांना अटक, एक आरोपी फरार - अकोला बनावट नोटा जप्त
अकोला - तेल्हारा पोलिसांनी 23 लाख 96 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून यामध्ये तिघांना अटक केली आहे. तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. अटक केलेल्यांकडून 54 हजार खऱ्या नोटा आणि 2 कार, असा एकूण 22 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अकोल्यामध्ये बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. तर जप्त केलेल्या बनावट नोटांवर भारतीय बच्चोका बॅंक असे, लिहीले आहे.