ईटीव्ही भारत 'फॅक्ट चेक' : मंत्रालयातील वस्त्रसंहितेच्या नियमाचे काय झाले? - ड्रेसकोड बंधन मंत्रालय
मुंबई - मंत्रालयात कर्मचाऱ्यांना वस्त्रसंहितेचे बंधन (ड्रेसकोड) घालण्यात आले आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने 11 डिसेंबरला जाहीर केले आहेत. त्यामुळे आता शासकीय कार्यालयात जाताना शासनाने दिलेले नियम पाळावे लागत आहेत. त्यानुसार कपडे परिधान करून लोक प्रवेश करत आहेत, की नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न (फॅक्ट चेक) ईटीव्ही भारतने आज केली. मात्र, अद्याप यासंदर्भात कारवाई व पाहणी सुरू झालेली नाही, अशी परिस्थिती आज मंत्रालयात दिसली. यासंदर्भात मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी..