VIDEO : लहान मुलं रमली किल्ले बनवण्यात; 10 फूट लांबीचे 30 हुन अधिक भव्य किल्ल्याचे प्रदर्शन - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. एकीकडे आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लेकरांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की, त्या दिवसापासूनच आपण किल्ला कसा बनवायचा? नेमकं काय नवीन करता येईल? हे चक्र लहान मुलांच्या डोक्यात फिरू लागत. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पुवर्जांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे. हाच पराक्रम दाखवण्यासाठी बच्चे कंपनीकडून किल्ले बनविले जातात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास व त्यांनी पराक्रम व शौर्याने जिंकलेल्या गड व किल्ल्यांची माहिती नवीन पिढीला समजावी. या हेतुने पुणे शहर शिवसेनेच्या वतीने गड किल्ल्यांची स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १० फूट लांबीचे ३० हून अधिक भव्य किल्ले आणि फोटोंचे प्रदर्शन पुढील सात दिवस पुणेकरांना पाहता येणार आहे. याचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आहे.याचाच आढाव घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने पाहूया....