#Happy Birthday Bacchu Kadu : आक्रमक शैलीतील जनसामान्यांचा आवाज - प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू
अमरावती - आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळती न केल्यास बँक व्यवस्थापकाची 'भाकड म्हशीवर बसवून, त्याची गावभर धिंड काढू' असा धमकीवजा इशारा देणारे बच्चू कडू महाराष्ट्राला परिचित आहेत. चार वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. आपल्या विविध आंदोलनांनी, वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत राहणाऱ्या बच्चू कडूंनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेकांना सळो की पळो करुन सोडले आहे. आज त्यांचा वाढदिवस. पाहा त्यांच्या कार्याविषयीचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट...