रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा; पहा अलिबाग किनाऱ्यावरील स्थिती - tauktae cyclone damage Raigad
रायगड - तौक्ते चक्रीवादळ हे रात्री अडीचच्या सुमारास रायगडच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. ताशी 70 ते 80 वेगाने हे वारे वाहत असून वादळ मुंबईकडे सरकले असले तरी त्याचा प्रभाव अजूनही रायगडात सुरू आहे. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने जिल्ह्याच्या अलिबाग समुद्रकिनाऱ्याहून तौक्ते चक्रीवादळाचा आढावा घेतला.