मुंबई : कोरोना निर्बंधानंतर काय आहे परिस्थिती; पाहा 'ईटीव्ही भारत'चा रिपोर्ट
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु रस्त्याच्या लगत असलेल्या हातगाडी व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी या लॉकडाऊनमध्ये देण्यात आली आहे. मात्र, या सुविधेमुळे या व्यावसायिकांनी काही मदत झाली आहे का, हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूला असलेल्या खाऊगल्लीत सध्यातरी या सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले आहे. केवळ पार्सल सेवेमुळे गिऱ्हाईक येत नसल्याचे या व्यावसायिकांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना दिलेली मुभा त्यांच्यासाठी उपयोगी नाही, असेच काहीसे चित्र आहे. तसेच टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनीही याचा कोणताही फायदा होत नसल्याचे चित्र आहे.