माझ्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई - उमेश कामत - प्रिया बापट
'आणि काय हवं'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. मुरांबा फेम वरुण नार्वेकरने या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. आता त्याच वेब सिरीजचा तिसरा सीझन 6 ऑगस्टपासून एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने मराठीतील फेमस कपल उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी ईटीव्हीशी संवाद साधला. यात उमेशने त्यांच्या केमिस्ट्रीविषयी आणि आपल्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सांगितले.