कोरोना वॉरियर्स : धारावीतील कोरोनाकाळातल्या अनुभवांबद्दल डॉक्टर्स सांगतात...
मुंबई - जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. मुंबईतील धारावी हा परिसर कोरोनाचा मुख्य 'हॉटस्पॉट' बनला होता. सुरुवातीच्या काळात धारावीत एकामागोमाग रुग्ण संख्या वाढत होती. मात्र, त्यानंतर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि खासगी डॉक्टर यांच्या सहकाऱ्यांने 'धारावी मिशन' राबवण्यात आले. याकाळात खासगी डॉक्टरांनीही मोलाची भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी कशाप्रकारे काम केले, कोणत्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले यासंदर्भात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर यांच्याशी बातचीत केलीये 'ई टीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी...
Last Updated : Jun 26, 2020, 9:37 PM IST