सध्या देशात 'व्हॉट्सअप हेरगिरी' प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून देशातील काही लोकांचे मोबाईल हॅक करण्यात आले होते, ज्याद्वारे त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. हे सर्व भारत सरकारने केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे, ज्यावर सध्या तपास सुरु आहे. नेमके काय आहे हे प्रकरण? कोणी केले आहे हे हॅकिंग? कशा प्रकारे आपल्यावर पाळत ठेवली जात आहे? या सर्व बाबींवर सायबर विषयातील अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्याशी संवाद साधला आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..