कन्नड घाट वाहतुकीसाठी धोकादायक, दरड कोसळल्याने मोठी हानी
औरंगाबाद - कन्नड-चाळीसगाव घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पडलेला मलबा काढण्यासाठी अजून एक ते दोन दिवस लागणार असून हा घाट जड वाहतुकीसाठी योग्य नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मंगळवारी मध्यरात्री चाळीसगाव आणि कन्नड परिसरात मोठा पाऊस झाला. या पावसात कन्नड घाटात पाच ते सहा ठिकाणी दरड कोसळल्या. ज्यामध्ये एक ट्रक घाटात पडला. या दुर्घटनेत ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून गाडीत असलेल्या जनावरांचादेखील मृत्यू झाला आहे. तर पाच ते सहा वाहनांचे नुकसान झाले. तीन वाहन घाटात पडलेल्या मलाब्यात अडकली होती. ती वाहन बाहेर काढत्याच काम सुरू करण्यात आलं. दोन वाहन बाहेर काढण्यात आली असून एक वाहन काढत्याच काम सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. तर अजून दोन दिवस मदतकार्य चालणार आहे. या परिस्थितीचा ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी घटनास्थळावरुन घेतलेला आढावा.