'पर्यावरण दिन': तापमानवाढीमुळे वातावरणीय गणितं चुकली, ऋतुचक्रावर विपरीत परिणाम
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण अभ्यासक डॉ. व्यंकटेश मेतन यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. वातावरणीय बदल, तापमान वाढ, जैवविविधता आणि वन्यजीव यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. ऋतुचक्र बदलल्याने मानवाच्या जीवनावर होणारे परिणाम आणि प्राण्यांपासून मानवाला होणाऱ्या रोगांवर त्यांनी भाष्य केले. तसेच अनेक वर्ष वाइल्ड लाइफ फोटोग्राफर म्हणून कार्यरत राहिल्यानंतर या क्षेत्रातील अनुभव त्यांनी 'पर्यावरण दिन विशेष' मुलाखतीत शेअर केले.