VIDEO : रोहित्र दुरुस्तीच्या कारणावरून महावितरणच्या उप अभियंत्याला मारहाण - महावितरणच्या उप अभियंत्याला मारहाण
औरंगाबाद - विद्युत रोहित्रासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विद्युत रोहित्रासाठी महावितरणच्या उप अभियंत्याला फुलंब्रीमध्ये काही युवकांनी मारहाण केली आहे. विद्युत डीपी दुरुस्त केले जात नसल्यामुळे उप अभियंता कार्यलसमोर अभियंत्याला मारहाण करण्यात आली. बिल भरल्याशिवाय रोहित्र बदलून देणार नाही, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामीण भागातील लोक नाराज आहेत.