'एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईची एसआयटी चौकशी करावी' - Sharad pawar pune elgar parishad
31 डिसेंबर 2017 ला झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणाचा एसआयटी मार्फत स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत ही मागणी केली.