VIDEO : महाविकास आघाडीतील एकूण अकरा नेत्यांवर अटक कारवाई होणार - किरीट सोमैया
मुंबई - आघाडी सरकारचे मंत्री अनिल परब यांना तुरुंगात जावं लागणार असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी दिला आहे. दापोली येथील अनधिकृत बंगला, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. यासंबंधीची तक्रार आपण केली असून, त्यानंतर ही कारवाई सुरू झाली असल्याचं किरीट सोमैया यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या एकूण अकरा नेत्यांवर अटकेची कारवाई होईल, असे भाकीतही किरीट सोमैया यांनी केले आहे.