Video : आधी ग्रामपंचायत करा मगच मतदान; पांघरी महादेव गावात निवडणुकीवर बहिष्कार - Election boycott
वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावात गेल्या वीस वर्षांपासून ग्रामपंचायत नाही. ग्रामपंचायत मिळावी यासाठी वारंवार विविध स्तरावर मागणी करूनही त्याची दखल घेण्यात न आल्याच्या निषेधार्थ पोटनिवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतली. त्यासंदर्भात मंगरुळपीर तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आज गावात ईव्हीएमसह प्रशासकीय यंत्रणा पोहोचली. मात्र ग्रामस्थांनी बहिष्कार टाकत एकही मतदान झाले नाही. त्यामुळं लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने जिल्हा प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे.