खडसे गहिवरले.. म्हणाले, खोटे आरोप करणाऱ्यांवर शिक्षेसाठी करा कायदा - अधिवेशन
'उभं आयुष्य मी राजकारण केले. ४० वर्ष सतत निवडून आलो. मात्र, माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाने मला वेदना झाल्या आहेत. त्यामुळे मी भ्रष्ट, नालायक आमदार आहे, हा शिक्का घेऊन मला बाहेर जायचे नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसेंनी त्यांच्या मनातील खदखद आणि भावनांना विधानभवनात वाट मोकळी करुन दिली.