पुणे शहरात आठ तर जिल्ह्यात 31 रुग्णालये लसीकरणासाठी सज्ज - पुणे कोरोना लसीकरण न्यूज
पुणे - कोरोना विरुद्धच्या लढ्यात आज (16 जानेवारी) महत्वपूर्ण पाऊल टाकले जात आहे. आज संपूर्ण भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. त्यादृष्टीने रुग्णालयांनी तयारी केली आहे. पुणे जिल्ह्यात 31 रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जाणार आहे यातील आठ रुग्णालये शहरातील आहेत. सकाळी दहा ते पाच या वेळेत लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी व राहुल वाघ यांनी...
Last Updated : Jan 16, 2021, 10:34 AM IST