VIDEO : मिठी नदी ओव्हरफ्लो; इमारतींमध्ये शिरलं पाणी - मुंबई रेन न्यूज
मुंबई - मंगळवारी रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. कुर्ला येथील मिठी नदीचे पाणी जवळपास राहणाऱ्या इमारती, घरांमध्ये शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मिठी नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने.काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, दरवर्षी नदीतला गाळ काढला जातो. या वर्षी साधारण 70 टक्के गाळ काढला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली होती.