ड्रग्ज प्रकरण : शाहरूखचा मुलगा आर्यनला अटक, सलमान रात्रीच 'मन्नत' बंगल्यावर दाखल - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अटक
मुंबई : अभिनेता सलमान खान रात्री 10 वाजल्यानंतर शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर दाखल झाला. अर्थातच सकाळपासूनच शाहरुखच्या घराबाहेर माध्यमकर्मींनी गर्दी केली आहे. त्यामुळे शाहरुखच्या घरातून कोण बाहेर पडतंय? कोण आत जातंय? यावर कॅमेऱ्यांचं बारीक लक्ष आहे. सलमान खान रात्री आला त्यावेळेस तो येत असल्याची कुणकुण पत्रकारांना लागलेलीच होती. त्यामुळे तो येताच कॅमेऱ्यांनी एकच गराडा घातला. सलमान मन्नतवर येण्याचे कारणही ठोस आहे. काल शाहरूखचा मुलगा आर्यन याला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली. आज आर्यनच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, या निमित्ताने सलमान शाहरूखच्या बंगल्यावर गेल्याचे दिसले. सध्या बॉलिवूडसह देशभर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. आर्यनवर नक्की काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.